गुटखा विक्री करणाऱ्यांवर मोक्कातर्गत कारवाई…

213
2
Google search engine
Google search engine

राजेंद्र शिंगणे; गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या जाणार…

मुंबई,ता.०९: अवैधरीत्या गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यासंदर्भातला प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आला असून लवकरच यासंदर्भात निर्णय होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
अवैधरीत्या गुटखा साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कलम १८८ व ३२८ नुसार गुन्हा दाखल करण्यात येऊ नये. या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत, असे श्री शिंगणे यांनी सांगितले. अन्न -सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींसंदर्भात भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ व ३२८ कलम लावण्यात येत होती. परंतु काही गुटखा व्यापाऱ्यांनी या कलमांना आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने सरकारची बाजू ऐकून घेत औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.