पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करणे सावंतवाडीच्या संस्कृतीला शोभत नाही…

333
2
Google search engine
Google search engine

 

पुंडलिक दळवी; घडलेल्या घटनेचा पोलिसांनी योग्य तो तपास करावा…

सावंतवाडी ता.१०: पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करणे हा प्रकार सावंतवाडी शहराच्या संस्कृतीला भूषणावह नाही,₹.या प्रकाराची पोलिसांची चौकशी करावी,अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी केली आहे.दरम्यान ते हॉटेल चालविणार्‍या मंगेश दळवी यांच्या आम्ही पाठीशी आहोत,तसेच याबाबत नगरपालिकेने योग्य ती भूमिका घेऊन संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा,असेही श्री.दळवी यांनी म्हटले आहे.
येथील पालिकेचा प्रकल्प असलेल्या शिल्पग्राम रिसॉर्ट वर काही अज्ञात लोकांकडून हल्ला झाला.त्या ठिकाणी नासधूस करण्यात आली.केबिन आणि झाडाच्या कुंड्या फोडण्यात आल्या. हॉटेल व्यवस्थापनाला शिवीगाळ करण्यात आली.याबाबतची माहिती मिळाल्यानंतर श्री.दळवी यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली.
यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे.अशा प्रकाराला येथील जनतेने खतपाणी घालू नये,तसेच या प्रकाराची पोलिसांनी चौकशी करावी,असे म्हटले आहे.