तिलारी प्रकल्पातून मडुऱ्यापर्यंत आलेले “ते” पाणी तपासणीसाठी सोडले…

185
2
Google search engine
Google search engine

संबंधित अधिकाऱ्यांची माहिती; काम पूर्ण होण्यास दोन-तीन वर्ष लागणार…

बांदा,ता.१५:  तिलारी प्रकल्पावर आधारीत महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी मडुऱ्यापर्यंत आले असे समजत मडुरा ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. परंतु ते पाणी फक्त तपासणीसाठी सोडण्यात आले असून काम पूर्णत्वास येण्यास अजून दोन तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे एमजीपी कार्यकारी अभियंता नितीन उपरेलु यांनी सांगितले.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाचे पाणी सावंतवाडी व वेंगुर्ले तालु्नयातील गावांना पाईपलाईनद्वारे वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकर विभागाकडून ठिकठिकाणी तपासणीचे काम सुरू आहे. दोडामार्ग, हेदुस, बांदा, शेर्ले, मडुरा, पाडलोस ते वेंगुर्ले असे नियोजन असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या पाण्याची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गावांना पाणी देण्यात येणार असून सद्यस्थितीत निधीअभावी काम रखडत आहे. या योजनेच्या माध्यमातून दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी योजनेतील समाविष्ट गावांना बारमाही मिळणार आहे. आवश्यक निधी मिळाल्यास वेंगुर्लेपर्यंत पाणी जाण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे, कार्यकारी अभियंता नितीन उपरेलु यांनी सांगितले.
दरम्य़ान, बांदा-शिरोडा मार्गावरील मडुरा गावापर्यंत पाणी आल्याने आता आम्हालाही पाणी मिळणार असल्याने मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत