रेल्वेत नोकरीचे आमीष दाखवून युवतीवर अत्याचार…

412
2
Google search engine
Google search engine

कणकवली येथील घटना; संशयिताला २७ पर्यंत पोलिस कोठडी…

कणकवली, ता.२३: रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका युवतीवर अत्याचार करणार्‍या एकाला आज पोलिसांनी अटक केली. रत्नू उर्फ रतन विष्णू कांबळे (रा.नागवेरोड, कणकवली) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अत्याचार झालेल्या युवतीने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपी रत्नू उर्फ रतन कांबळे याच्यावर काल (ता.२२) गुन्हा दाखल केला होता. कोकण रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत कांबळे याने पीडित युवतीशी जवळीक साधली होती. स्वतःचे लग्न झालेले असतानाही ही बाब पिडितेपासून लपवून ठेवली होती. त्यानंतर पीडित युवतीवर अत्याचार केल्याची फिर्याद सदर युवतीने कणकवली पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार आरोपी रतन विष्णू कांबळे ला अटक करून महिला पोलिस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी आज कणकवली न्यायालयासमोर हजर केले. सरकारी वकील अ‍ॅड गजानन तोडकरी यांनी आरोपीला पोलिस कोठडी मिळावी यासाठी जोरदार युक्तिवाद केला.
अ‍ॅड.तोडकरी यांनी आरोपी रत्नू याच्यावर रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक केल्याचे कणकवली आणि राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणली. आरोपीने पीडित युवतीशी कोठे लग्न केले ? पीडितेवर कोणत्या लॉजवर शारीरिक संबंध ठेवले ? आदी बाबींच्या तपासकामी आरोपीला पोलिस कोठडी मिळावी असा युक्तिवाद अ‍ॅड तोडकरी यांनी केला. सरकारी वकील अ‍ॅड तोडकरी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश सलीम जमादार यांनी आरोपी रत्नू कांबळे याला २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.