मुंबईची लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सुरू होणार…

2422
2
Google search engine
Google search engine

मुख्यमंत्र्यांकडून निर्णय; तीन टप्प्यांत सेवा, मात्र वेळेची मर्यादा…

मुंबई,ता.२९: कोरोनाच्या धर्तीवर बंद करण्यात आलेली “मुंबई द लाईफ लाईन” ठरणारी लोकल सेवा पुन्हा एकदा १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडून घेण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होणार आहे. ही सेवा सर्व प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या लोकल पासून उशिरापर्यंत ही सेवा तीन टप्प्यांत सुरू करण्यात येणार आहे. मात्र धोका लक्षात घेता, आस्थापना कंपन्या व कार्यालयाने आपली वेळापत्रके बदलण्यात यावी, अशा सूचना श्री.ठाकरे यांनी दिले आहेत.