सावंतवाडीत कोरोना योद्यांना डावलून गरज नसलेल्यांना “लसीचा डोस”…

436
2
Google search engine
Google search engine

परिमल नाईकांचा आरोप; पुरावे देतो,चौकशी करा प्रशासनाकडे मागणी…

सावंतवाडी ता.२९: कोरोना काळात स्वतःच्या जीवावर उदार होवून सेवा बजावणार्‍या सावंतवाडी पालिका कर्मचारी असलेल्या कोरोना योध्दयांना डावलून गरज नसलेल्या लोकांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयात कोरोनाची लस दिल्याचा आरोप सावंतवाडी पालिकेचे नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती परिमल नाईक यांनी केला आहे.दरम्यान हा प्रकार योग्य नाही,अशी नाराजी त्यांनी व्यक्त करून या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे.त्यासाठी आवश्यक असलेले पुरावे आपल्याकडे आहेत,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.नाईक यांनी याबाबत माहीती दिली.ते म्हणाले,कोरोनाच्या काळातील ९ महीने आरोग्य सेवेसह सावंतवाडी पालिकेत काम करणार्‍या अनेक कर्मचार्‍यांनी आपल्या जीवावर उदार होवून काम केले.या काळानंतर ज्या वेळी लस आली,त्यावेळी संबधित कर्मचार्‍यांना ही लस देण गरजेचे होते.मात्र त्या ठीकाणी आरोग्य प्रशासनाकडुन मुख्य घटकांना वगळून ज्यांना गरज नाही, अशा लोकांना लस दिली आहे .याबाबतचे आपल्याकडे पुरावे आहेत. हा प्रकार योग्य नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी व्हावी,आणि संबधितांवर कारवाई व्हावी,अशी मागणी श्री।नाईक यांनी केली आहे.