सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा…

342
2
Google search engine
Google search engine

राज्य शासनाकडून निर्णय;सुमारे पावणे आठशे संस्थाच्या होणार निवडणूका…

ओरोस,ता.२:
कोरोना संक्रमणामुळे १८ मार्च २०२० पासून सलग चार वेळा मुदतवाढ मिळालेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्याच्या निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे निवडणुकावर आणलेली स्थगिती उठली असून मुदतवाढ मिळालेल्या संस्थासह २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे पावणे आठशे सहकारी संस्थाच्या निवडणुका होणार आहेत.