परिमल नाईकांच्या दणक्यानंतर अखेर पालिका कर्मचा-यांना लस….

122
2
Google search engine
Google search engine

आरोग्य प्रशासन खडबडून जागे; पोलिस कर्मचा-यांनाही लस देण्याची मागणी…

सावंतवाडी ता.०२: कोरोनाच्या काळात योद्धा म्हणून काम करणारे येथील पालिकेचे १० कर्मचारी व १ वैद्यकीय अधिकारी यांना कोरोना लस देण्यात आली.कोरोना योद्ध्यांना डावलून गरज नसलेल्यांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयात लस दिली जात असल्याचा आरोप नगरसेवक परिमल नाईक यांनी केला होता.याची गंभीर दखल संबंधित आरोग्य प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.याबाबतची माहिती श्री.नाईक यांनी दिली.
ते म्हणाले, सावंतवाडी रुग्णालयात खऱ्या कोरोना योद्ध्यांना डावलून गरज नसलेल्यांना कोरोना लसीचा डोस दिला जात होता.याबाबत आपण नाराजी व्यक्त केली होती.तर या प्रकाराची चौकशी व्हावी,अशी मागणी केली होती. याची गंभीर दखल आरोग्य प्रशासनाने घेतली असून तात्काळ पालिकेतील दहा कर्मचारी व एक वैद्यकीय अधिकारी यांना कोरोना लसीचा डोस दिला आहे.