जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहिर…

160
2
Google search engine
Google search engine

ओरोस,ता.३:
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग अंतर्गत समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत जिल्हयातील विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांसाठी (दिव्यांग) चित्रकला स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा 3 ते 6, 7 ते 11, 12 ते 18 वर्षे वयोगट निहाय ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे.
समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष गरजाधारक बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून सदर बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने सदरच्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभट 346 विद्यार्थी सहभागी झाले होते.. सुरूवातीला तालुकास्तरावर या स्पर्धा घेण्यात आल्या. आपल्या दिव्यांगत्वावर मात करून उत्तम अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. तालुकास्तरावर प्रथम, िव्दतीय, तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय परीक्षण करण्यात आलेले होते. त्याचा निकाल जाहिर करण्यात आला आहे.

चित्रकला स्पर्धा : वयोगट 3 ते 6-अनुष परब, कुपवडे नं. 1, कुडाळ (प्रथम), काजल नरसुले, उभादांडा नं.1, वेंगुर्ले (द्वितीय), हर्ष कुणकेरकर, नेमळे, सावंतवाडी (तृतीय). वयोगट 7 ते 11 – शशांक जाधव, सांगवे घोसाळ, कणकवली (प्रथम), चैतन्य भगत, कसाल कुंभारवाडा, कुडाळ (द्वितीय), आर्यन बाईत, नाडण नं.1 (तृतीय). वयोगट 12 ते 18 – गुरूप्रसाद चव्हाण, शेठ म ग हायस्कूल, देवगड (प्रथम), कुणाल निरोमकर, जामसंडे हायस्कूल, देवगड (द्वितीय), साक्षी मिरजुळे, विदय़ामंदिर कणकवली (तृतीय) .
अभिनय स्पर्धा (एकपात्री नाटय) वयोगट 7 ते 11 – अनुष्का पाटील, बापर्डे धुरेवाडी, देवगड (प्रथम), विघ्नेश नाईक, अणसूर खालचे, वेंगुर्ले (द्वितीय), हर्षाली म्हाडगूत, बांदा नं.1, सावंतवाडी (तृतीय). वयोगट 12 ते 18 – श्रुती पाटील, बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ले, (प्रथम), संस्कार मसके, नेरुर हायस्कूल, कुडाळ (द्वितीय), यश काणेकर, साटेली भेडशी हायस्कूल, दोडामार्ग (तृतीय).
गीतगायन स्पर्धा : वयोगट- 3 ते 6- अनुष परब, कुपवडे नं.1, कुडाळ (प्रथम), चैताली गवस, जि. प. शाळा झोळंबे, दोडामार्ग (द्वितीय). वयोगट- 7 ते 11 – सोहम साळगावकर, आजगाव नं.1, सावंतवाडी (प्रथम), दिक्षा पोळजी, आरवली सखेलखोल, वेंगुर्ले (द्वितीय), गौरव देवळेकर, जि. प. शाळा महाळुगे नं. 1, देवगड (तृतीय). वयोगट- 12 ते 18- प्रतिक घाडीगावकर, नाटळ हायस्कूल, कणकवली (प्रथम), ऋजुता भागवत, मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव, सावंतवाडी (द्वितीय), कृष्णा सावंत, अ.वि.बावडेकर विदयालय, शिरोडा, वेंगुर्ले (तृतीय), ऋषिकेश ताम्हाणेकर, र. दे. वि मालवण, (उत्तेजनार्थ).
नृत्य स्पर्धा : वयोगट – 7 ते 11 दीपश्री नाईक, नेतर्डे नं.1, सावंतवाडी (प्रथम), शिफा शेख, सांगेली सावरवाडा, सावंतवाडी (द्वितीय), दिक्षा पोळजी, आरवली सखेलखोल, वेंगुर्ले (तृतीय). वयोगट – 12 ते 18 – जयेश घुबे, अणसूर खालची, वेंगुर्ले (प्रथम), रिध्दी तांबे, बिडवाडी हायस्कूल, कणकवली (द्वितीय), गुरूप्रसाद चव्हाण, शेठ म. ग. हायस्कूल देवगड (तृतीय).
कथाकथन स्पर्धा : वयोगट – 7 ते 11 – सांची पाटयेकर, ओरोस बु. नं 1, कुडाळ, (प्रथम), निहाल मोरजे, ओरोस मुख्यालय, कुडाळ (द्वितीय), सायली दिघे, निळेली डेअरी, कुडाळ (तृतीय). वयोगट – 12 ते 18 – प्राजक्ता जाधव, अ. वि. बावडेकर विद्यालय शिरोडा, वेगुर्ले (प्रथम), चेतन जाधव, नाटळ हायस्कूल, कणकवली (द्वितीय), आनंद परब, कुंदे नं. 1, कुडाळ (तृतीय).