माडावरून खाली कोसळल्यामुळे ओटवणे येतील एकाचा मृत्यू…

918
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी रुग्णालयात करण्यात आले होते दाखल; पोलीस ठाण्यात नोंद…

सावंतवाडी ता.०४: माडाच्या झाडावरून खाली कोसळल्यामुळे ओटवणे येथील एकाचा मृत्यू झाला आहे.ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.श्रीधर चंद्रकांत वारंग (४५) रा.मांडवपाथरवाडी,असे त्यांचे नाव आहे.दरम्यान त्यांना अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.