शिवसेनेचे “आक्रोश आंदोलन” म्हणजे जनतेची क्रूर चेष्टाच…

176
2
Google search engine
Google search engine

प्रसाद गावडे; सत्ताधारी सेनेकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न…

कुडाळ ता.०५: पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचे “आक्रोश आंदोलन” म्हणजे जनतेची क्रूर थट्टाच आहे,असा टोला मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी लगावला आहे.दरम्यान या आंदोलनातून सत्ताधारी शिवसेना स्वतःची जबाबदारी झटकत आहे,असाही आरोप त्यांनी यावेळी केला.याबाबत श्री. गावडे यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,केंद्रातील भाजप व राज्यातील शिवसेना या पक्षांमध्ये जनतेची पिळवणूक किती करायची,कोणी किती लुटायचं,आणि नवीन करांचा बोजा माथी किती मारायचा याची जणू स्पर्धाच लागलेली आहे.यामध्ये सामान्य माणूस मात्र वाढलेल्या महागाईच्या झळांनी रोज किती मरण यातना भोगतो आहे.याची किंचितही जाणीव या नादान राज्यकर्त्यांना नाही.पेट्रोल डिझेल इंधनांचे भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून शतकाच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत.तरीसुद्धा राज्यकर्ते एकमेकांवर टीका टिप्पणी करून नौटंकी करण्यात धन्यता मानत आहेत,हे दुर्दैव आहे.एकीकडे राज्यकर्त्यांकडून पेट्रोल डिझेल विक्रीच्या नावाखाली जनतेची अक्षरशः पिळवणूक होत असताना राज्यातील सत्ताधारी शिवसेना स्वतःच राज्यव्यापी आंदोलन पुकारून जनतेची जणू क्रूर चेष्टाच करत आहे.
आधी कोरोना संचारबंदी, त्यातून ठप्प अर्थव्यवस्था,वाढलेली बेरोजगारी व महागाईमुळे सामान्य माणसाची जगण्यासाठी चाललेली धडपड व एकूण संघर्ष संघर्ष याचे किंचितही सोयरसुतक केंद्रातील व राज्यातील सरकारांना उरलेले नाही.पेट्रोल व डिझेल वर केंद्र व राज्य सरकार मिळून प्रति लिटर जवळपास ५८℅ कर वसुली करत असून लूटमारी करत आहेत.असा आरोप त्यांनी केला आहे.