सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कामगार सेलच्या अध्यक्षपदी विजय कदम…

269
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०८:राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कामगार सेलच्या अध्यक्षपदी विजय कदम यांची निवड करण्यात आली आहे.आज याबाबतचे पत्र त्यांना देण्यात आले.पक्षसंघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने त्यांची ही निवड करण्यात आलेली आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुरेश प्रांतिक सदस्य उदय भोसले,महिला जिल्हाध्यक्ष रवती राणे,सावंतवाडी शहराध्यक्ष सत्यजित धारणकर,संदीप राणे, भाई सावंत,तुषार भोसले,रवी राऊळ आदी उपस्थित होते.