सरमळे येथे आयोजित आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद….

252
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०९:सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या निशुल्क ”रोगनिदान व चिकित्सा” शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबिराचे आयोजन सरमळे गावात करण्यात आले होते.शंभरहुन अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.यावेळी आवश्यक औषधे रुग्णांस निशुल्क उपलब्ध करून देण्यात आली.
या शिबिरात शितपवाडी सिंहगर्जना ग्रुपसह संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात रक्तगट, हिमोग्लोबिन, ब्लड शुगर सह हाडांची घनता ई. तपासण्या करण्यात आल्यात.
या शिबिरात डॉ शंकर सावंत, डॉ नंदादीप चोडणकर, डॉ विशाल पाटील,डॉ मीना जोशी व डॉ मुग्धा ठाकरे यांनी रुग्ण तपासणी करून उपचार केले.यावेळी आवश्यक बरीचशी औषधे रुग्णास निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आली. सर्व रुग्णांना मास्क वाटप करण्यात आले. या शिबिराचा लाभ सुमारे १०० नागरिकांनी घेतला.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सौ वेलांकिनी कार्डोस, भार्गवराम शिरोडकर, दिपक गावकर, सिद्देश मणेरीकर, अँड्र्यू फर्नांडिस, आनंद मेस्त्री, संतोष नाईक या सिंधुमित्रांसह संदिप जंगले, रामू जंगले, विजय जंगले व इतर शितपवाडीवासीयांनी परिश्रम घेतले.सर्वप्रकारच्या तपासण्या, तज्ञ वैद्यकीय सल्ला, औषधोपचार, मास्क वाटप ई. निःशुल्क परंतु दर्जेदार सेवाभावी उपक्रमाबाबत शितपवाडीतील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.