सावंतवाडी रुग्णालय परिसरातील उपहारगृहाच्या शेड मध्ये चोरी…

161
2
Google search engine
Google search engine

१३ हजाराचे लोखंडी पाईप लंपास; अज्ञाता विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल…

सावंतवाडी ता.१०: येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरातून सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या उपहारगृहाचे १३ हजार ४०० रुपये किमतीचे लोखंडी पाईप अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत.याप्रकरणी संस्थेचे चेअरमन राजेंद्र राणे यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय परिसरात वेर्ले येथील सुशिक्षित बेरोजगार विविध सेवा सहकारी संस्थेने उपहारगृहाची शेड उभारली होती.मात्र कोरोना काळात हे उपहारगृह सुरू करण्यात आले नव्हते.दरम्यान श्री.राणे हे काल त्याठिकाणी पाहणी करायला गेले असता त्यांना तिथे ठेवलेले लोखंडी पाईप आढळून आले नाहीत.त्यामुळे त्यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत चोरीची तक्रार दिली आहे