सावंतवाडीतील आठ ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात…

269
2
Google search engine
Google search engine

११ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया;३ ग्रामपंचायती सेनेकडे…

सावंतवाडी ता.११: तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळवले आहे.तर तीन ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.ही सरपंच-उपसरपंच निवड प्रक्रिया आज पार पडली.
यात आरोंदा,मळेवाड,दांडेली,डिंगणे,आंबोली,चौकुळ,कोलगाव,मळगाव आदी ग्रामपंचायतीवर भाजपाचे सरपंच-उपसरपंच बसले आहेत.तर तळवडे,इन्सुली आणि आरोस ग्रामपंचायतीवर शिवसेनेला यश मिळाले आहे.