उंबर्डे अल् बरकात सोशल कमिटीचा वर्धापन दिन १४ फेब्रुवारीला

261
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी,ता.१२: उंबर्डे मेहबूबनगर येथील अल् बरकात सोशल कमिटीचा तृतीय वर्धापन दिन रविवार दि. १४ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. या निमित्त गावातील प्रशालेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती उंबर्डे ग्रामपंचायत सदस्य काशीम रमदूल यांनी दिली आहे. तरी या वर्धापन सोहळ्याला ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन कमिटीचे अध्यक्ष कादिर फरास, उपाध्यक्ष जावेद पाटणकर, सचिव गौस पाटणकर, खजिनदार हाजी नाचरे यांनी केले आहे.