सावंतवाडी मोती तलावात पुन्हा पाणमांजराच्या कळपाची हजेरी…

1043
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.०५:
येथील मोती तलावात पाच ते सहा पाणमांजरांचा कळप आज अनेकांच्या दृष्टीस पडला.त्या पाणमांजरांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.पर्यावरणाच्या दृष्टीने पाण मांजरांचे अस्तित्व महत्त्वाचे मानले जाते. मात्र सावंतवाडीतील मोती तलावात असलेल्या पाण मांजरांकडुन तलावातील मासे फस्त केले जाणार असल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा,अशी मागणी येथील स्थानिक नगरसेवक परीमल नाईक यांनी केली होती.त्यामुळे हा वादाचा मुद्दा ठरला होत. या मुद्द्यावरून काही पर्यावरण प्रेमींनी आपली नाराजी व्यक्त केली होती.दरम्यान हल्ली ही पाणमांजरे गायब होती.परंतु आज त्यांनी पुन्हा आपली हजेरी लावली.