कार्यकर्त्यांकडून टक्केवारी घेणाऱ्यांनी राज्य सरकारवर आरोप करू नयेत…

275
2
Google search engine
Google search engine

विनायक राऊत ; कणकवलीत आशा सेविकांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार..

कणकवली, ता. १५ : कार्यकर्त्यांकडून टक्केवारी घेणाऱ्या नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टक्केवारीचे आरोप करू नयेत. तसेच जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांचे ५ कोटी रुपये कोणी हडप केले ते देखील जाहीर करावे अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी आज केली.
येथील भगवती मंगल कार्यालयात कणकवली शिवसेनेच्यावतीने खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कणकवली तालुक्यातील आशा सेविकांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमावेळी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत शिवसेना नेते संदेश पारकर अतुल रावराणे तालुकाध्यक्ष शैलेश भोगले प्रथमेश सावंत आदी उपस्थित होते.
खासदार नारायण राणे यांनी नुकतेच राज्य सरकारवर टीका केली होती या टीकेचा समाचार श्री राऊत यांनी आज येथे घेतला. कणकवलीत एका राजकीय नेत्याचं घर जाळलं तेव्हा अक्षरशः आम्ही बादलीतून पाणी आणून घर विझवल. असं सांगत संदेश पारकर यांच्याकडे रोख ठेवत राऊत यांनी चिमटा काढला. आय पी डी एस योजनेतून केंद्राकडून ​४५ कोटीचा निधी चार नगरपालिका साठी दिला गेला. भूमिगत विद्युत वाहिन्यांमुळे जनतेला याचा फायदा होणार होता. मात्र सावंतवाडी व कणकवली या दोन नगरपालिकाची सत्ता चुकीच्या लोकांकडे दिली गेली. आणि तेथेच घोळ झाला. कणकवली नगरपंचायत ने भूमिगत विद्युत वाहिन्या ची गरज नाही असे सांगत रस्ते खोदाईसाठी प्रति मीटर पाच हजार रुपयाचा दर सांगितला. असा आरोप राऊत यांनी केला. प्रतिभा डेरी चे पैसे नारायण राणे यांच्या मुलाने ढापले अशी टीका राऊत यांनी केली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त असून, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी बँक नावारूपाला आणली. शिवसेनेच्या माध्यमातून होत असलेला विकास जनतेपर्यंत पोचवण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे असेही आवाहन राऊत यांनी केले. यावेळी महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, सतीश सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. कणकवली तालुक्यातील सुमारे ​१२५ आशा सेविका यांचा सत्कार पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हा प्रमुख म्हणून रुपेश पावस्कर यांची नियुक्ती करण्यात आली. आशा सेविका च्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात आशा सेविका वैशाली गुरव यांनी मनोगत व्यक्त करताना तुटपुंज्या मानधनावर आशा सेविका यांना काम करावे लागते . पालकमंत्री व खासदार विनायक राऊत यांनी आशा सेविकांचा मानधन वाढीबाबत विचार करावा असे आवाहन केले. तसेच शिवसेनेच्या विभाग निहाय महिलांकडून राऊत यांचे औक्षण करण्यात आले. त्याचबरोबर कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने ​५००० मास्कचे वाटप पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.