सिंधुदुर्गात आज १४ कोरोना पॉझिटिव्ह…

235
2
Google search engine
Google search engine

जिल्हा शल्य चिकित्सक ; जिल्ह्यात २०२ सक्रीय रुग्ण…

सिंधुदुर्गनगरी,ता.२२: जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ३३६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.