राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हयला कांस्य पदक…

93
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.३०: राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रभावी उपाययोजना राबविल्याबद्दल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्ली तर्फे कांस्य पदक जाहिर झाले आहे. हे बक्षीस रु.२ लाखाचे जाहीर झालेले आहे.
जिल्ह्याच्या क्षयरुग्णांचा संख्येत २०१५ नंतर २० टक्के घट झाल्याबाबद्दल या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी देशातून ७२ जिल्हे व महाराष्ट्रातून ११ जिल्हे नामांकित झाले होते. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही नामांकित झाले होते. केंद्रीय क्षयरोग विभागाच्या मार्गदर्शक सुचनानुसार नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इपिडेमॉलॉजी चेन्नई आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची विविध निकषांची पडताळणी करण्यात आली. पडताळणी मध्ये कास्यपदकासाठी नामांकन झाले आहे. २०१५ च्या आधारावर २० टक्के पेक्षा जास्त क्षयरुग्ण संख्येत घट दिसून आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्ली तर्फे कांस्य पदकाने सन्मानित करण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिपे आदींचे सहकार्य लाभले अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांनी दिली.