वैभववाडीत कोरोनाची दहशत; आज ११ पाॕझिटीव्ह तर एकाचा मृत्यू…

238
2
Google search engine
Google search engine

तर हाॕटस्पाॕट ठरलेल्या दिगशीत कंटेंमेंट झोन

वैभववाडी/पंकज मोरे,ता.१२: तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. आज ११ पाॕझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर तालुक्यात हाॕटस्पाॕट ठरलेल्या दिगशी गावात आज ४ कोरोना पाॕझिटीव्ह सापडले आहेत.तर अदयाप ५५ जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. तर संपूर्ण दिगशी कंटेंमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. तर नावळे गावठाण येथील ६७ वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या ११५ सक्रीय रुणांवर उपचार सुरु आहेत.तर आतापर्यंत ३०७ रुग्णांची नोंद झाली आहे.
तालुक्यातील कोरोना पादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.नव्याने दिगशी ४, खांबाळे १, नावळे १, करुळ २, एडगाव ३ असे एकूण ११ रुग्ण सापडले आहेत.तर नावळे येथील ६७ वर्षीय इसमाचा कोरोनाने ओरोस येथे मृत्यू झाला आहे.त्यामुळे तालुक्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.
तालुक्यातील दिगशी गाव हे कोरोनाचे हाॕटस्पाॕट बनला आहे.आतापर्यंत ८१ लोकांची आरटीफीसीआर चाचणी घेण्यात आली आहे.यातून आतापर्यंत २०.रुग्ण सापडले आहेत.तर अदयाप ५५ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.
खबरदारीची उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाच्यावतीने दिवशीमध्ये सर्व्हे सुरु आहे.लक्षणे आढळलेल्या लोकांचे स्वॕब घेण्यात येत आहेत.सुरुवातीला लोकांकडून सहकार्य मिळत नव्हते, त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनीधी, पोलिस यंञणेची मदत घेण्यात येत आहे.संपूर्ण गावात सॕनिटायझर करण्यासाठी जंतुनाशक औषध पुरविण्यात आले आहे.
संपूर्ण गावात कंटेंमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे.वैभववाडी पोलिसांकडून पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.पोलिस निरीक्षकपदी अतुल जाधव यांनी सहका-यांसह गावात भेट देऊन पहाणी केली.