सावंतवाडी तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग….

1255
2
Google search engine
Google search engine

पोक्सो कायद्याअंतर्गत ; एकावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सावंतवाडी ता.१८: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार सावंतवाडी शहराच्या बाजूला असलेल्या एका गावात घडला आहे.ही घटना काल शनिवारी घडली.याप्रकरणी ३१ वर्षीय तरुणावर पोक्सो अंतर्गत येथील पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची माहिती ठाणे अंमलदार दिलीप धुरी यांनी दिली
याबाबत अधिक माहिती अशी की,रोमिओ फ्रान्सिस गोम्स,असे संशयिताचे नाव आहे.दरम्यान याबाबतची तक्रार संबंधित पीडित मुलीच्या नातेवाइकांनी दिली आहे.त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.संबंधित संशयिताने त्या मुलीला प्रथम हाक मारून बोलावले व त्यानंतर प्रतिसाद न मिळाल्याचे लक्षात येताच तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. व विनयभंग केला अशी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.