धुरी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे मालक राजेश धुरी यांचे निधन

121
2
Google search engine
Google search engine

आज रात्री कणकवलीतील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

कणकवली, ता.२२ : ​ कांबळीगल्ली येथील रहिवासी धुरी मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे मालक राजेश आत्माराम धुरी (​वय ४२) यांचे आज गुरुवारी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
गेले काही दिवस जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. धुरी मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून यांचे अनेकांशी स्नेहाचे संबंध होते. त्यांचा कणकवलीसह जिल्ह्यात मोठा मित्रपरिवार होता.मूळ मालवण तालुक्यातील बुधवळे येथील राजेश धुरी हे व्यवसायानिमित्त कणकवलीत स्थायिक झाले होते. त्यांच्यावर आजच गुरुवारी रात्री कणकवली येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, भाऊ, असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ओरोस येथे रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.