जानवलीत महामार्गावर मोटरसायकल-कार अपघात दोघे जखमी ; एक गंभीर

1140
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.३ : मुंबई – गोवा महामार्गावरील जानवली येथे हॉटेल निलम कंट्रीसाईड समोर कार आणि मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात दोन मोटरसायकलस्वार जखमी झाले आहेत.
दुपारी सव्वा तीन च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात मोटरसायकलवरील दोघे जखमी झाले. त्यातील एकाची स्थिती गंभीर असून त्याचा पाय तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहे. अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात जखमी मोटरसायकलस्वार पडला होता. कणकवली येथील शासकीय ठेकेदार अनिस नाईक यांनी घटनास्थावरून जात आताना जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश गवस यांना अपघाताची कल्पना दिली. हवालदार गवस यांनी कणकवली पोलिस ठाण्यात कळविल्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात घटनास्थळी लागलीच दाखल झाले. तोवर दुपारच्या उन्हात हायवे गरम होऊन अपघातग्रस्त जखमी च्या अंगाला चटके लागत होते. ठेकेदार अनिस नाईक यांनी कारमधील मॅटिंग काढून त्याच्या अंगाखाली घातले. पोलीसांच्या सुमो गाडीत जखमींना घालून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.