कणकवलीत दुपारी बारा वाजेपर्यंत खरेदी साठी गर्दी, तेरा दिवसानंतर उघडली बाजारपेठ…

44
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.१४ : शहर बाजारपेठेत आज सकाळी आठ वाजल्यापासूनच बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता. पटवर्धन चौकापासून ते पटकीदेवी मंदिरापर्यंत बहुतांशी दुकाने सुरू होती. मात्र एवढ्या प्रचंड प्रमाणातील गर्दी कणकवली तालुक्यात कोरोना समुह संसर्गाला निमंत्रण देणारी ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. दुपारी साडे अकरा वाजल्यानंतर देखील शहरातील काही दुकाने खुलेआम सुरू होती. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून ही दुकाने बंद करण्यासाठी वारंवार सूचना देण्यात येत होती. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अत्यावश्यक सेवेत नमूद केलेली दुकानेही सकाळी ७ ते दुपारी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर देखील दुकाने सुरू असल्याने बाजारात झालेली गर्दी ओसरण्यासाठी दुपारी बारा वाजल्यानंतर हळूहळू सुरुवात होऊ लागली. नगरपंचायतच्या पथकाने अकरा वाजल्यानंतर ही सुरू असणारी दुकाने बंद करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही त्याकडे डोळेझाक केली जात होती . कणकवली नगरपंचायतच्या पथकामध्ये आज न प कर्मचारी रवी महाडेश्वर, संतोष राणे, प्रशांत राणे, रमेश कदम यांच्यासह वाहतूक पोलीस संदेश आबिटकर हे देखील सहभागी झाले होते.