केसरकरांची शिवसेनेत किंमत राहिली नसल्यानेच,रुग्णवाहिका परत बोलावली…

35
2
Google search engine
Google search engine

संजू परब; पालकमंत्री उदय सामंत श्रेयासाठी घाणेरडे राजकारण करत असल्याची टीका…

सावंतवाडी ता.०८: बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर झालेली रुग्णवाहिका परत बोलावली हे पालकमंत्री उदय सामंत श्रेय वादासाठी घाणेरडे राजकारण करत आहेत.त्यांच्या या भूमिकेमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,अशी आपली मागणी असणार आहे.असा इशारा नगराध्यक्ष तथा भाजपचे प्रवक्ते संजू परब यांनी आज येथे दिला.दरम्यान आमदार दीपक केसरकर यांची पक्षात म्हणावी तशी किंमत राहिली नाही.त्यामुळे त्यांच्या मतदार संघासाठी मंजूर झालेली रुग्णवाहिका परत बोलावण्यात आली, हे आमचे दुर्दैव आहे,असाही टोला श्री.परब यांनी लगावला.
श्री.परब यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर,बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
यावेळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला जाहीर करण्यात आलेली रुग्णवाहिका अर्ध्यातून परत बोलावणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.लोकांचे प्राण जात असताना त्या ठिकाणी तात्काळ रुग्णवाहिका देणे गरजेचे होते.परंतु केवळ आपल्याला श्रेय मिळावे यासाठी बांद्याच्या दिशेने जाणारी रुग्णवाहिका पालकमंत्र्यांनी परतवली,हा प्रकार सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी शोभत नाही.एकीकडे रुग्णांचे जीव जात असताना त्यांनी घेतलेली भूमिका ही निंदनीय आहे.सरकार कोणाचेही असो कोणत्याही पक्षाचे असो, त्या ठिकाणी श्रेयवादासाठी राजकारण होत असेल तर योग्य नाही.याबाबत आम्ही भाजप म्हणून जोरदार नाराजी व्यक्त करत आहोत.
यावेळी त्यांनी आमदार केसरकर यांच्यावर टीका केली.सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील जनतेवर आता केसरकर यांचा लक्ष राहिले नाही.पक्षात सद्ध्या त्यांना किंमत नाही.त्यामुळेच पालकमंत्री सामंत यांनी हे धाडस केले आहे.या सर्व प्रकारात केसरकर कमी पडलेले आता दिसून येत आहे।त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या उदय सामंत व केसरकर यांच्या भूमिकेचा आपण जाहीर निषेध करतो आहे,असे परब म्हणाले.