लसीकरणाचे वाचलेले सात हजार कोटी गरीबांना द्या

22
2
Google search engine
Google search engine

नितेश राणे : मोफत लसीकरणाबद्दल मोदी सरकारचे आभार

कणकवली, ता.०८ : देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. एकरकमी धनादेश देऊन लसखरेदी करण्याची तयारी दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने वाचलेल्या सात हजार कोटींच्या निधीतून आता गरिबांना द्यावेत,अशी मागणी भाजपाच्यावतीने आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
श्री.राणे यांनी म्हटले की, गोरगरीब जनता, शेतकरी, बारा बलुतेदार, रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, केश कर्तनालयांचे चालक तसेच टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्या सर्वांकरिता तातडीने पॅकेज जाहीर करावे, ठाकरे सरकारकडे केली आहे.
देशातील लसीकरण मोहिमेची सूत्रे केंद्र सरकारने हाती घेतल्याने राज्यातील लसीकरणाचा खेळखंडोबा संपणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने स्वतः उचलल्याने देशातील जनतेस मोठा दिलासा मिळणार आहे, या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत.