वेतोरेतील संतोष पालकर यांचे गोवा-बांबुळीत उपचारादरम्यान निधन…

96
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले ता.१५: तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी येथील रहिवासी आणि सद्या कोलगाव- सावंतवाडी येथे राहणारे संतोष धोंडी पालकर (वय 37) यांचे आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. मुंबई गोवा महामार्गार कणकवली येथे दोन दिवसांपूर्वी अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.त्यांच्या निधनामुळे वेतोरे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कणकवली जानवली येथील तरंदळे फाट्यावरील नवीन ब्रिज वर स्विफ्ट कार व बलेरो एकमेकांवर आदळत हा अपघात घडला होता. शुक्रवारी ११ जून रोजी रात्री उशिरा घडलेल्या या अपघातात वेतोरे येथील स्विफ्ट कारमधील संतोष सह त्याची पत्नी, दोन मुले अशा प्रकारे ४ जण गंभीर जखमी झाले होते. तसेच टेम्पो चालकाला दुखापत झाली होती. दरम्यान प्राथमिक उपचारासाठी सर्वांना कणकवली रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संतोष पालकर (वय 37) हे पत्नी समीक्षा पालकर (वय 32) व आपल्या दोन मुलांसह फोंडाघाट येथे जात असताना दुधाची वाहतूक करणारी बोलेरो गाडी यांच्यात धडक होऊन हा अपघात घडला.
दरम्यान संतोष पालकर व त्यांची पत्नी या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना संतोष पालकर यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, वहिनी, पुतणे, विवाहित बहिणी असा परिवार आहे.