देवगड-निपाणी मार्गावर असलदे येथे कारला अपघात…

27
2
Google search engine
Google search engine

क्रेटा कार विद्युत पोलला आदळली…

कणकवली, ता.१९: तालुक्यातील देवगड निपाणी मार्गावर असलदे शिवाजी नगर येथे क्रेटा कार विद्युत पोलला आदळली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालं नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.
देवगड ते कोल्हापूरला जाणारी क्रेटा कार
( एम. एच. ०९ इ. यु. २२९४) असलदे शिवाजी नगर येथे आली असता चालकाचा ताबा सुटल्याने झाडावरून विद्यूत खांबांवर जावून कार धडकली. यात विद्युत पोल व विद्युत तारा ही तुटून पडल्या होत्या. तर कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे येथे काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती .
याबाबत माहिती समजताच सरपंच पंढरी वायंगणकर यांनी तात्काळ धाव घेतली आणि लाईट बंद करण्यासाठी सांगितले. लाईनमन यासिर मास्के, सुनील इंदप तांबोळी यांनी तात्काळ धाव घेतली. आता विद्युत तारा व पोल हटवून वाहतूक पुर्वरत सुरू करण्यात आली आहे.