सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी ४.१२५ मि.मी. पाऊस…

15
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.०१: जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी ४.१२५ मि.मी पाऊस झाला असून १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी ११०१.४३७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – ०२(११९४), सावंतवाडी – ०८(१३६०.१), वेंगुर्ला – ०७(८५२.४०), कुडाळ – ०१(९८०), मालवण – ०५(१०४५), कणकवली – ०२(१२४१), देवगड – ०२(९१४), वैभववाडी – ०६(१२२५) असा पाऊस झाला आहे.