विलवडे व तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय साहित्य भेट…

37
2
Google search engine
Google search engine

बांदा ता.०२: वाफोली गावचे सुपुत्र तथा एलआयसीचे विकास अधिकारी महेंद्र बळीराम गवस यांनी सामाजिक बांधिलकी जपत विलवडे व तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रात पीपीई किट, हॅन्ड सॅनिटायझर यासह आवश्यक वैद्यकीय साहित्य देणगी दिले. त्यांच्या या सामाजिक दातृत्वाचे कौतुक होत आहे.

कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. कोरोना काळात रुग्णांना वैद्यकीय साहित्य मिळावे यासाठी गवस यांनी पीपीई किट, हॅन्ड सॅनिटायझर, फेस शिल्ड, कॉटन उल, मास्क, ऑक्सिजन फ्लो मीटर यासह आवश्यक वैद्यकीय साहित्य देणगीदाखल दिले.
यावेळी भाजपा युवा तालुका उपाध्यक्ष विनेश गवस, डॉ.संजय सावळ, तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी श्री गवस यांचे आभार मानले.