विनापरवाना काडतुस बंदुक बाळगल्याप्रकरणी कणकवलीत एकावर गुन्हा दाखल…

37
2
Google search engine
Google search engine

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई; पंचवीस हजार रुपये किमतीची बंदूक जप्त…

कणकवली ता.०९: विनापरवाना सिंगल बॅरल काडतुसची बंदूक बाळगल्याप्रकरणी दारिस्ते-पवारवाडी येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनील राजाराम पवार (४५),असे त्याचे नाव आहे. ही कारवाई काल सायंकाळी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.दरम्यान संबंधितांकडून २५ हजार रुपये किमतीची बंदूक जप्त करण्यात आली असून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दारीस्ते येथे एका व्यक्ती जवळ विनापरवाना सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक शाहू देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, हवालदार ए.ए.गंगावणे, चंद्रकांत श्रावण नार्वेकर,कृष्णा केसरकर, रवी इंगळे,पी.पी.गावडे यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास धाड टाकली.यावेळी
दारिस्ते-पवारवाडी येथिल भवानी मंदिराजवळील सुनील राजाराम पवार याच्या घरा जवळील गवताच्या माचात सुमारे २५००० रुपये किमतीची विनापरवाना काडतुसाची बंदूक आढळून आली. ती जप्त करण्यात आली.
या कारवाईनंतर जप्त केलेला मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिला. याबाबतची तक्रार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे चंद्रकांत श्रावण नार्वेकर यांनी दिली आहे. पोलिसांनी सुनील पवार याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत आहे.