सावंतवाडीतील निवृत्त एसटी वाहकाचा “तो” खूनच…

64
2
Google search engine
Google search engine

अज्ञातावर गुन्हा दाखल ; सात तोळ्याचे दागीने लंपास…

सावंतवाडी/शुभम धुरी ता.०९: येथील सबनिसवाडा भागात मृतावस्थेत आढळलेल्या रमेश राघो ठाकुर यांचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे.दरम्यान त्यांची भाची मिनाक्षी चोडणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची माहीती पोलिस ठाण्याचे निरिक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली.
चोडणकर यांनी दिलेल्या तक्रारीत आपल्या मामाला दागिन्यांसाठी अज्ञाताने गळा दाबून खून केल्याचे म्हटले आहे.त्यानुसार पुढील तपास पोलिस करीत आहोत, असे श्री.हुंदळेकर यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहीती अशी की,सावंतवाडी-सबनिसवाडा परिसरात राहणाऱ्या ठाकुर यांचा मृतदेह संशयास्पद आढळून आला होता. दरम्यान बाजूला राहणार्‍या लोकांनी खात्री केल्यानंतर त्यांच्या गळ्यात असलेले दागिने गायब झालेले दिसून आले. तर एक सोनसाखळीचा तुकडा मृतदेहाच्या बाजूला मिळाला होता.यावरुन त्यांचा खून झाला असावा,असा प्राथमिक निष्कर्ष होता .दरम्यान त्यांच्या भाचीने आज याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार गळ्यातील दागिने लंपास करण्यासाठी अज्ञाताने त्यांचा खून केला असावा,असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे वैदयकीय अधिकार्‍यांनी शवविच्छेदन अहवालानंतर काढलेल्या निष्कर्षानुसार त्यांचा गळा दाबला असावा,असा संशय व्यक्त केला आहे .त्यानुसार अज्ञात संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .दरम्यान याबाबतचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सौ.स्वाती यादव यांनी केला आहे.तर पुढील तपास श्री.हुंदलेकर करीत आहेत. ही घटना घडल्यानंतर परिसरात नेमके कोण फिरत होते?, कोण आले होते?, याचा शोध पोलिस घेत आहे. तसेच हा प्रकार माहितगाराने केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.