शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

35
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०९: शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.जान्हवी सावंत यांचा वाढदिवस आज मळगाव येथे शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत आणि आमदार दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी सौ.सावंत या राजकीय आणि सामाजिक जीवनात यशस्वी व्हाव्यात,अशा शुभेच्छा त्यांना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडुन देण्यात आल्या.

यावेळी संपर्क प्रमुख श्री.अरुण दुधवडकर,जिल्हा प्रमुख संजय पडते,गटनेते नागेंद्र परब, विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत,दोडामार्ग संपर्क प्रमुख सज्जन धाऊसकर,युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर,सावंतवाडी तालुका प्रमुख रूपेश राऊळ,वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत परब, दोडामार्ग तालुका प्रमुख बाबुराव धुरी,उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी,एकनाथ नारोजी, गणेशप्रसाद गवस,सचिव देसाई, प्रेमानंद देसाई,सुकन्या नरसुले, योगेश नाईक,पंकज शिरसाट, संजय गवस,दुबळे आदी उपस्थित होते.