जिल्हा बँकेला “ईडी”ची नोटीस नाही, मात्र कर्जाची माहिती मागवली……

170
2
Google search engine
Google search engine

सतीश सावंत ; विरोधकांकडून हेतुपुरस्कर बदनामी केली जात असल्याचे म्हणणे…

ओरोस ता.१२:सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला “ईडी”कडून कोणत्याही प्रकारची नोटीस बजावलेली नाही. मात्र कर्जाची माहिती मागविण्यात आली आहे.
त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारा तो “मेसेज” फेक आहे, नाहक कोणी ग्राहकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करू नये असे स्पष्टीकरण जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले.दरम्यान आज दिवसभरात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला ईडीची नोटीस,असा मॅसेज असलेला एक फोटो सोशल मीडियावर फिरत आहे.मात्र अशा प्रकारची कोणतीही नोटीस ईडीडून बजावण्यात आली नसून अशा मॅसेजवर कोणीही विश्वास ठेवू नये,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.याबाबत श्री.सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली.