सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी…

270
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी ता.२२: जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची आज सकाळी ८:०० वा. मोजण्यात आलेल्या नदी पातळीनुसार पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे.

तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.400 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 5.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 6.300 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.