कोंबड्यांच्या खुराड्यात घुसलेला भलामोठा अजगर अखेर जेरबंद…

96
2
Google search engine
Google search engine

इन्सुलीतील घटना; १० कोंबडी केली फस्त,वनविभागाच्या दिले ताब्यात…

सावंतवाडी ता.२५: इन्सुली येथे कोंबड्यांच्या खुराड्यात घुसलेल्या भल्यामोठ्या अजगराला पकडण्यात यश आले आहे.संबंधित अजगर काल रात्रीच्या सुमारास खुराड्यात घुसल्याचा अंदाज आहे.दरम्यान त्याने आतील दहा कोंबडी फस्त केली.ही घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर मालक अशोक पडवळ यांनी सर्पमित्र विनोद गावकर यांना याबाबतची माहिती दिली.त्यानंतर श्री.गावकर यांनी घटनास्थळी येत “त्या” अजगराला जेरबंद केले व वनविभागाच्या ताब्यात दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित परिसरात गेले अनेक दिवस “त्या” अजगराचा वावर होता. यापूर्वीही त्याने अनेक कोंबडी फस्त केली आहे.दरम्यान “तो” अजगर आज पडवळ यांच्या खुराड्यात आढळून आला. रात्रीच्या सुमारास तो आत शिरला असावा असा अंदाज आहे. हा प्रकार सकाळी उघडकीस आला.दरम्यानच्या काळात त्यांने आतील दहा कोंबडी फस्त केली. त्यामुळे पडवळ यांचे नुकसान झाले आहे.मात्र संबंधित अजगराला जेरबंद करण्यात यश आल्यामुळे परिसरातील सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.