आजाराला कंटाळून कुडाळात वृध्दाची गळफास लावून आत्महत्या…

270
2
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.२६: आजारपणाला कंटाळून कुडाळ औंदुबरनगर येथिल वृध्दाने आपल्या राहत्या घराच्या बाजूला गळफास लावून आत्महत्या केली आहे.गणपत महादेव गवंडे (वय ७५) असे त्यांचे नाव आहे.याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.ही खबर त्यांचा मुलगा योगेश यांने दिली आहे.

श्री गवंडे गेले काही दिवस आजारी होते.त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते.काल ते नेहमी प्रमाणे रात्री जेवून झोपले होते. मात्र सकाळी ते घरात नव्हते.यावेळी शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह घराच्या बाजूला असलेल्या पडवीत नायलॉन दोरीला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.याबाबतची माहीती ठाणे अमलदार सौ डीसोझा यांनी दिली.