मांंगेली फणसवाडी येथिल डोंगराला भेगा, काही भाग खचला…

210
2
Google search engine
Google search engine

भूगर्भशास्त्रज्ञांकडून पाहणी; योग्य ती उपाययोजन करण्याच्या प्रशासनाला सुचना…

दोडामार्ग,ता.२८: मांगेेली फणसवाडी येथिल वस्तीच्यावर असलेल्या डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे परिसरातील जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत.परिणामी परिसरात भितीचे वातावरण आहे.याबाबत माहीती मिळाल्यानंतर भुगर्भशास्त्रज्ञ सागर देसाई व संतोष पाटील यांनी त्याठीकाणी भेट दिली.बेसुमार वृृक्षतोड,आणि अतिवृष्टी व भुगर्भातील हालचालीमुळे हा प्रकार घडला आहे.त्यामुळे वेळीच यावर योग्य ती उपाययोजना करा,अशा सुचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी ,महसूल नायब तहसीलदार नाना देसाई,मांगेली सरपंच विश्वनाथ गवस, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ गवस तसेच महसूल कर्मचारी उपस्थित होते.
भेग पडलेल्या डोंगराच्या खाली फणसवाडीतिल वरच्या वाडयावरील लोकवस्ती आहे . या लोकवस्तीला भविष्यात धोका उद्भवू शकतो. याकडे सरपंच विश्वनाथ शेटकर व ग्रामपंचायत सदस्य एकनाथ गवस यांनी लक्ष वेधले. अतिवृष्टी , बेसुमार वृक्षतोड आणि त्यामुळे भूगर्भातील बदलणाऱ्या पाण्याच्या हालचाली हे या भूस्खलनाचे प्रमुख कारण असून भविष्यात हे प्रमाण वाढू शकते त्यामुळे लागलीच त्यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगून याबाबत आपण महसूल विभागास अहवाल सादर करणार असल्याची माहिती दिली.