दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक ५१ मि.मी. पाऊस…

21
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.०४: जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक ५१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ३१.७ मि.मी. पाऊस झाला असून १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी २७८८.४८ मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 51(2747), सावंतवाडी – 29(2997.1), वेंगुर्ला – 15.6(2282.8), कुडाळ – 34(2656), मालवण – 06(2980), कणकवली – 50(3073), देवगड – 28(2438), वैभववाडी – 40(3134), असा पाऊस झाला आहे.