सावंतवाडी-काजरकोंड येथील तरूणाची गळफास लावून आत्महत्या…

1716
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.१६: येथील काजरकोंड परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना काल दुपारी उघडकीस आली.विल्सन डिसोजा,असे त्याचे नाव आहे.दरम्यान याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती ठाणे अंमलदार राजलक्ष्मी राणे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,संबंधीत तरुण काल राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.दरम्यान नातेवाइकांकडून याबाबतची खबर पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.