रेल्वेत पाकीटमारी करणारे दोघे परप्रांतीय ताब्यात…

1046
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडीतील घटना; युवतीचे मोबाईल व पाकीट चोरल्याचा आरोप…

सावंतवाडी ता.१६: रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या युवतीचे मोबाईल व पाकीट चोरल्या प्रकरणी येथील पोलिसांनी दोघा परप्रांतीयांना ताब्यात घेतले आहे.संबंधीत युवती तुतारी एक्सप्रेस मधून प्रवास करत होती.यावेळी हा प्रकार घडला.दरम्यान तिने दिलेल्या तक्रारीनुसार दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवम कुमार (१९) व शिवा कुमार (१९) दोघे रा.उत्तरप्रदेश, अशी संशयितांची नावे असून त्यांना सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. संबंधित युवती तुतारी एक्सप्रेसमधून मुंबईतून-मळेवाड येथे येत होती. यावेळी तिच्या बॅगमधील मोबाईल,पॅन कार्ड,आधार कार्ड व अन्य किमती वस्तू त्यांनी लंपास केल्या होत्या. दरम्यान सावंतवाडी स्थानकात उतरल्यानंतर वडिलांना फोन करण्यासाठी तिने मोबाईल पाहिला असता तो आढळून आला नाही. त्यामुळे आपला मोबाईल व इतर साहित्य चोरीला गेल्याचे तिच्या लक्षात आले. यावेळी तिने रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेले पोलिस दीपक लोंढे यांना याबाबतची कल्पना दिली. त्यानंतर लोंढे यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना घेऊन त्या डब्यात तपासणी केली असता ते दोघे संशयास्पदरीत्या आढळून आले. त्यामुळे त्यांची तपास करत असताना चोरीला गेलेल्या मोबाईल व अन्य वस्तू आढळून आल्या.