सिंधुदुर्ग स्वच्छतेत पुन्हा एकदा देशात अव्वल स्थान निर्माण करेल…

164
2
Google search engine
Google search engine

संजना सावंत,प्रजित नायर; जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारी मुक्त करणार…

ओरोस ता.१७: आपला सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात नव्हे,तर पश्चिम भारतात पहिला हागणदारी मुक्त जिल्हा झाला.तेच सातत्य राखत देशाच्या स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील ४१ महसुल गाव पहिल्या टप्यात हागणदारी मुक्त अधिक (ODF+) होत आहेत.येत्या काहि दिवसात जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारी मुक्त अधिक (ODF+) होतील व राज्यात नव्हे तर देशात सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत पुन्हा एकदा अव्वल स्थान निर्माण करेल,असा विश्वास जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अध्यक्षा संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
अध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, महिला व बाल विकास सभापती शर्वाणी गांवकर, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, प्रवीण काणकेकर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सौ सावंत व नायर यांनी आपला जिल्हा हागणदारी मुक्त झालेनंतर जिल्ह्याची वाटचाल हागणदारी मुक्त अधिक (ODF+) कडे सुरु झाली होती. हागणदारी मुक्त गाव संकल्पनेत गावातील 90 टक्के कुंटुबांकडे वैयक्तिक शौचालय असणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे गावातील एकही व्यक्ती उगड्यावर शौचास जाता नये असा निकष होता. तर हागणदारी मुक्त अधिक (ODF+) गावातील वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा वापर गावातील कुंटुंबाकडुन होत असला पाहिजे तसेच गावातील एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जाता कामा नये. गावातील सांडपाण्यासाठी वैयक्तिक किंवा सार्वजनिक ठिकाणी शोषखड्डे निर्मिती तर घनकच-या करीता वैयक्तिक व सार्वजनिक ठिकाणी खतखड्डे उभारणे गरजेचे आहे. गावातील प्लॉस्टिक कच-या करीता प्लॉस्टिक संकलन शेड व गावातील कचरा गोळा करण्याकरीता बॅटरी ऑपरेटेड व मॅन्युअल ट्रायसायकल घेणे गरजेचे आहे. हागणदारी मुक्त अधिक (ODF+) चे निकष पुर्ण करीत असताना गावात स्वच्छतेचे संदेश रंगविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे गावातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ असणे गरजेचे आहे.

पहिल्या टप्यात देवगड तालुक्यातील 4, दोडामार्ग तालुक्यातील 5, कणकवली तालुक्यातील 10, कुडाळ तालुक्यातील 9, मालवण तालुक्यातील 1, सांवतवाडी तालुक्यातील 3, वैभववाडी तालुक्यातील 8, वेंगुर्ला तालुक्यातील 1 महसुली हागणदारी मुक्त अधिक (OFD+) होत आहेत. पहिल्या ट्प्यात देवगड तालुक्यातील ग्रामपंचायत गिर्ये मधील महसुल गाव बांदेगाव, ग्रामपंचायत तळवडे मधील महसुल गाव बागतळवडे, ग्रामपंचायत हिंदळे मधील महसुल गाव मोर्वे, ग्रामपंचायत वाघिवरे मधील महसुल गाव वेळगिवे, दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायत आडाळी मधील महसुल गाव फोंड्ये, ग्रामपंचायत वझरे मधील महसुल गाव गिरोड, ग्रामपंचायत कुडासे खुर्द, ग्रामपंचायत कोलझर मधील महसुल गाव शिरवल व उगाडे, कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत लोरे मधील महसुल गाव गांगेश्वर, ग्रामपंचायत तरेळे मधील महसुल गाव औदुंबरनगर, ग्रामपंचायत बिडवाडी मधील महसुल गाव हुंबरणे व बिडवाडी, ग्रामपंचायत सातरल मधील महसुल गाव सातरल, ग्रामपंचायत भरणी मधील महसुल गाव भरणी, ग्रामपंचायत कासरल मधील महसुल गाव कासरल, ग्रामपंचायत पिसेकामते मधील महसुल गाव पिसेकामते, कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत गोठोस मधील महसुल गाव निळेली, ग्रामपंचायत माणगाव मधील महसुल गाव भट्टीवाडी, ग्रामपंचायत वाडोस मधील महसुल गाव कांदुली, ग्रामपंचायत कुपवडे मधील महसुल गाव गवळगाव, ग्रामपंचायत हिर्लोक मधील महसुल गाव किनलोस, ग्रामपंचायत बांबुळी तर्फे हवेली मधील महसुल गाव नेहरुनगर, ग्रामपंचायत गोवेरी मधील महसुल गाव गोंधयाळे, ग्रामपंचायत शिरगाव- कुसगाव मधील महसुल गाव कुसगाव, ग्रामपंचायत नेरुर क नारुर मधील महसुल गाव चाफेली, मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत श्रावण मधील महसुल गाव गवळीवाडी तर सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत केसरी फणसवडे मधील महसुल गाव फणसवडे, ग्रामपंचायत कोनशी मधील महसुल गाव दाभिळ, ग्रामपंचायत देवसु दाणोली मधील महसुल गाव दाणोली वैभववाडी तालुक्यातील ग्रामपंचायत करुळ मधील महसुल गाव भुयादेवाडी, ग्रामपंचायत निमअरुळे, भुईबावडा,अरुळे, ग्रामपंचायत जाभवडे मधील महसुल गाव पालांडेवाडी व जांभवडे, ग्रामपंचायत खांबाळे मधील महसुल गाव मोहितेवाडी, तर वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायत मोचेमाड हे जिल्ह्यातील 41 महसुली गाव हागणदारी मुक्त अधिक (ODF+) होत आहेत. येत्या काहि महिन्यात सर्व ग्रामपंचायती हागणदारी मुक्त अधिक (ODF+) होऊन राज्यात नव्हे तर देशात स्वच्छतेच्या क्षेत्रात जिल्ह्याचा आदर्श निर्माण करीतील असा विश्वास जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अध्यक्षा श्रीम. संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी व्यक्त केला. तसेच जिल्ह्यातील सर्व हागणदारी मुक्त अधिक (ODF+) झालेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, तालुक्याचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जि. प. सिंधुदुर्ग, गटसंसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी मा. उपाध्यक्ष श्री. राजेद्र म्हापसेकर, वित्त नि बाधकाम सभापती श्री. महेद्र चव्हाण, महिला बाल कल्याण सभापती श्रीम. शर्वाणी गावकर, श्री. विनायक ठाकुर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आदी मान्यवर उपस्थित होते.