विविध मागण्यांसदर्भात अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद अध्यक्षांना दिले निवेदन…

87
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.१८: जिल्ह्यातील अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना विविध मागण्या व समस्यांचे निवेदन सादर केले.शासकीय गणवेश,ओळखपत्र,भाऊबीज रक्कम वाढवावी,अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
दिवसाला १०० रुपये या तुटपुंज्या मानधनावर अंशकालीन स्त्री परिचर काम करीत असून शासनाच्या विविध योजना शोषित पीडितांपर्यंत पोचवितात. अशांना मदतीचा हात देण्यासाठी कणकवली पंचायत समितीचे सभापती मनोज तुळशीदास रावराणे, कोकण भजन सम्राट तथा उपसभापती प्रकाश सखाराम पारकर यांच्याशी बैठक झाल्यानंतर कणकवली तालुक्यातील स्त्री परिचर महिलांना साड्या वाटप केल्या. असा साड्या,गणवेश,ओळख पत्र, रेनकोट जिल्ह्यातील सर्वांना देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात प्रामुख्याने करण्यात आली. यासाठी अध्यक्षा संजना सावंत यांची भेट घेतली, अशी माहिती जिल्हाध्यक्ष उषा लाड यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषद सरळसेवा भरतीसाठी पूर्वी प्रमाणे १० टक्के आरक्षण लागू करणेत यावे. मानधनात वाढ करणेत यावी. कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व रजा लागू करण्यात याव्यात. शासकीय गणवेश देणेत यावा. शासकीय ओळखपत्र देण्यात यावे. अंशकालीन स्त्री परिचर रिक्त पदे भरण्यात यावीत. अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता व अनुभवानुसार प्रथम प्राधान्याने नेमणूक करण्यात यावी. कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात यावे. जिल्हा फंडातून मिळत असलेल्या तुटपुंज्या भाऊबीज रकमेमध्ये वाढ करण्यात यावी. शासकीय कर्मचा-यांप्रमाणे विमासंरक्षण लागू करुन प्रोत्साहन भत्ता दरमहा मिळावा, अशा १० मागण्यांचे सादरीकरण कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव रावजी गंगाराम यादव यांनी केले.
यावेळी संजना सावंत यांनी आम्ही कणकवली येथे दिलेल्या आश्वासनानुसार गणवेश, ओळखपत्र, रेनकोट देण्याची कार्यवाही केली आहे. त्यांनी आगामी सभेपूर्वी पूर्तता न झाल्यास आपणांस कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आरोग्य विभागाला दिला.