दारू वाहतूक प्रकरणी डेगवे येथे सावंतवाडीतील दोघे ताब्यात…

703
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई; इनोव्हा कारसह साडे दहा लाखाचा मुद्देमाल जप्त…

बांदा,ता.२२: गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सावंतवाडीमधील दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई काल रात्री तीन वाजता डेगवे येथे करण्यात आली. यात त्यांच्याकडे असलेल्या इनोव्हा कारसह १० लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आनंद मेस्त्री व नेल्सन फर्नांडिस दोघे (रा. सावंतवाडी), अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची तक्रार एलसीबीचे पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर कांदळगावकर यांनी बांदा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार त्या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती हवालदार विजय जाधव यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डेगवे रस्त्यावर दारू वाहतूक होणार असल्याची माहिती अज्ञातांकडून एलसीबीच्या पथकाला देण्यात आली होती. त्यानुसार पथकाकडून डेगवे रस्त्यावर सापळा रचण्यात आला होता. यावेळी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास हे दोघेजण गाडी घेऊन येताना दिसले त्यांच्या गाडीची तपासणी केली असता त्यांच्या गाडीत सुमारे २ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे. त्या प्रकरणी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील पडवळ करत आहेत.