जिल्ह्यातील रेशन दुकानावर पुरवठा करण्यात येणारा तांदुळ निकृष्ट….

66
2
Google search engine
Google search engine

धीरज परबांचा आरोप;लोकांच्या जिवीताशी खेळ नको,जिल्हा प्रशासनाला इशारा…

कुडाळ,ता.२५: जिल्ह्यातील रेशन दुकानावर पुरवठा होणारा तांदूळ हा भरड्या स्वरूपाचा आहे. त्यात मोठ्या प्रमाणात कणिक,भेसळ आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवा,अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे करण्यात आली आहे.दरम्यान असा तांदूळ कुठल्या आदेशाने आणि कोणाच्या आशीर्वादाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला आहे.याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे. तशी तक्रार आम्ही केली आहे.असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, हा प्रकार म्हणजे गोरगरिबांच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न आहे. हा तांदूळ जिल्ह्याबाहेरील डीलर्स ने सप्लाय केला आहे. तसेच रेशनिंगच्या तांदळात २५ % एवढे कणी असावी,असा शासन निर्णय आहे.परंतु या तांदळात ६० % जास्त कणिक व भेसळ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तहसीलदार व सामाजिक कार्यकर्ते यांनी त्या ठिकाणी जाऊन तांदळाची पाहणी करावी,आणि तसे अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करावे.आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कार्यवाही न केल्यास अशा प्रकारचा भेसळ तांदूळ ज्या गोडाऊन मध्ये आढळेल ते गोडाऊन लॉक करू,असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.