बांदा भाजपच्या वतीने आरोग्य सेवक राजन गवस यांचा सत्कार..

32
2
Google search engine
Google search engine

बांदा, ता.२८: बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या सात वर्षांपासून प्रामाणिक आणि कार्यतत्पर सेवा रुग्णांना पुरवणारे आरोग्य सेवक राजन गवस यांची बदली झाली आहे. त्यांचा आज बांदा भाजपतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.,

श्री. गवस यांचा जिल्हा परिषद सदस्या सौ. श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, महिला तालुकाध्यक्ष प्रियंका नाईक, महिला शहराध्यक्ष सौ. अवंती पंडित, माजी सरपंच बाळा आकेरकर, गुरुनाथ सावंत, शामराव सावंत, सुनील धामापुरकर, सौ. लक्ष्मी सावंत आदी उपस्थित होते.