भौतिक विज्ञानाचे बहुविध मार्ग विषयावर ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न…

3
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे आयोजन…

सावंतवाडी ता.३०: येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील रसायन शास्त्र विभागाच्यावतीने “भौतिक विज्ञानाचे बहुविध मार्ग” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. यावेळी रसायनशास्त्र विभागाचे सर्व प्राध्यापक-विद्यार्थी तसेच अनेक विद्यापीठातील प्राध्यापक-संशोधक असे एकूण चारशे वीस जण ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोसले यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले व ऑनलाइन उपस्थित प्राध्यापक व संशोधक यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.जी.एम.शिरोडकर यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एल.भारमल यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू डॉ. एस. एच. पवार यांचा परिचय प्रा. जी.टी. यादव यांनी करून दिला. डॉ. एस. एच. पवार यांनी भौतिक विज्ञानाचे बहुविध मार्ग यामध्ये नॅनोबायोमटेरियल, नॅनोटेक्नॉलॉजी यांचा कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांवर होणारा उपचार तसेच आधुनिक तंत्रज्ञानामध्ये भौतिक विज्ञानाचे महत्त्व याविषयी पीपीटीच्या माध्यमातून ऑनलाइन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यु. सी. पाटील यांनी केले तर आभार प्रा. एस. एम. वैरागे यांनी मानले. या ऑनलाईन चर्चासत्रासाठी प्रा. जी.एम शिरोडकर, प्रा. जी. टी. यादव, प्रा. एस. एल. वैरागे, गवळी प्राणी के मळीक प्रा पी एम दूरी प्रा बीपी परपरा आर बी सावंत एस पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.