दोडामार्ग-गोवा बसफेऱ्या गणेश चतुर्थीपूर्वी सुरू करा…

3
2
Google search engine
Google search engine

चेतन चव्हाणांची मागणी; भाजप युवक मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन…

दोडामार्ग, ता.३० : कोरोना महामारीमुळे गोवा राज्यातून दोडामार्गात ये-जा करणाऱ्या गोवा बसेस बंद आहेत. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांना गोव्यात जाणे आणि तालुक्या नजीक असलेल्या गावातून बाजारपेठेत येणाऱ्या लोकांवर याचा परिणाम होऊन याचा फटका बाजारपेठेला बसला आहे. अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर या गोवा बसेस सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने निवेदनातून दोडामार्ग तहसीलदारांकडे केली आहे.
यावेळी दोडामार्ग भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, व्यापारी संघ अध्यक्ष लवू मिरकर, समीर रेडकर,विष्णू रेडकर,प्रमोद कोळेकर,स्वप्नील गवस,दिलीप आसोलकर, संदेश गवस,विनायक खडपकर,कल्पेश गवस,रामदास पालकर,अभिमन्यू गवस आदी उपस्थित होते.