मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे आज सावंतवाडीत उद्घाटन…

1
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१२: संस्थानकालीन महत्त्व लाभलेल्या सावंतवाडी शहराच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. याठिकाणी जिमखाना मैदान येथील बाळासाहेब प्रबोधिनीच्या ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होत आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज दुपारी दोन वाजता ऑनलाईन उद्घाटन होत आहे. सावंतवाडी नगरपालिका आणि डिजिटल शिक्षण देणाऱ्या “ॲडमिशन” या संस्थेकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे याचा फायदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे. हे उपकेंद्र सावंतवाडीत आल्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष संजू परब आदी उपस्थित राहणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने हा समारंभ पाहता येणार आहे. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन ॲडमिशन संस्थेचे प्रमुख हर्ष साबळे यांनी केले आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, खा. विनायक राऊत, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. दीपक केसरकर, आ. नितेश राणे, आ. वैभव नाईक उपस्थितीत रहाणार आहेत.